21 व्या शतकात भारत देश खरच प्रगती करतोय का?
आज आपण एकविसाव्या शतकामध्ये जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक , राजकीय, तसेच आपला कृषीप्रधान भारत देश आणि इथला शेतकरी विकसित झाला आहे का सदन आहे का?
स्वामी विवेकानंद अगोदर पोटासाठी अन्नछत्र सुरू करणारे खरे विचारवंत होते. सर्वसामान्य लोकांना कशातच गुणवत्ता मिळत नाही, पोट भरायला शिळी भाकरी मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सर्व क्षेत्रामध्ये. शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठल्याच शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही परंतु खूप मोठे पोस्टर आणि योजनांचा भडिमार बॅनरबाजी आपल्याला बघायला मिळते.
बियाणे खत विद्युत पाणी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाच्या या गोष्टी परंतु शाश्वत विकासाची ध्येय फक्त नावालाच. केंद्र शासनाने युनिसेफ मार्फत 2030 पर्यंत सतरा उद्दिष्ट आणि सात वेगवेगळ्या थीम पूर्ण करू असे सांगितलेले आहे त्यासाठी किती निधी आला असेल आणि किती खर्च केला किती उपयोगी पडला हे देव जाणे?
विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले दिसतात शेतकरी रस्त्यावरती उतरलेले दिसतात सर्वात मोठी साधन संपत्ती म्हणजे विद्यार्थी आणि शेतकरी तरी देखील शासनाला घाम फुटत नाही तसेच या ठिकाणची पत्रकारिता स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणणारी केव्हाच विकली गेलेली आहे. आपल्या भारतामध्ये तमिळनाडू या राज्यामध्ये ज्या प्रकारे नवे मुख्यमंत्री चांगल्या प्रकारे काम करू इच्छिता त्यांना देखील अनंत अडचणी वाईट लोक आणणार. चांगले काम करणारे अधिकारी राजकारणामध्ये असणारे लोकप्रतिनिधी जास्त काळ टिकू दिले जात नाहीत त्यांना वाईट लोक आपल्या पंगतीला बसवतात.
ही फक्त स्वप्न दाखवतात सर्वसामान्यांना सत्ता स्वतःच्या ताब्यात ठेवून सत्तेचा पैशाचा गैरवापर केला जात आहे तसेच हे फक्त स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तसेच मोठे मोठे कार्यक्रम मोठे मोठे उदघाटन करून त्यासाठी लाखो रुपये खर्च केला जातो मात्र प्रत्यक्ष सर्वसामान्यांना काय म्हणते?
बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 283 कोटी रुपये निधी मिळतो. बीड जिल्ह्यामध्ये नगरपालिका चारशे फुटाचा रस्ता बनवण्यासाठी 200 कोटी दीडशे कोटी निधी लागला अशा वर्तमान पत्रातील बातम्या ऐकल्यानंतर मन भरून येतात प्रत्यक्षात तो रस्ता तो विकास योजनेमध्ये उतरत नाही मग हे पैसे जातात कुठे?
पेट्रोलमध्ये इथेनॉलची भेसळ यामुळे सर्वसामान्य लोकांना भुर्दंड मोठे द्रुतगती समृद्धी महामार्ग तयार करून त्यावर टोलनाके बसवलेले आहेत टोलनाक यांची वसुली कधीपर्यंत आहे हे कोणाला माहित नाही वसुली किती होते हे कुठे दिसत नाही. कोरोना सारखी महामारी आली तर ह्या लोकांना विचारायलाच नको सर्वसामान्यच्या माळ्याच्या टाळूवरील लोणी खाण्यामध्ये देखील हे मागे पुढे बघत नाहीत. लाखो करोडो रुपये हे व्यवसाय उद्योग उभा करण्यासाठी खर्च करत नाहीत तर मोठमोठ्या कंपन्या साखर कारखाने बंद पाडून तसेच जिल्हा मध्यवर्ती बँका यांचे करोडो रुपये कर्ज काढून अडचणीत आणल्यानंतर बीड जिल्ह्यातील आजपर्यंत अनेक सर्वसामान्यांचे पैसे बुडाले आहेत.
फक्त मतदानाच्या वेळेस या राजकीय घराणे शाहीतील लोकांना कोणत्याही पक्षात का असेना परंतु आपण आमदार खासदार आणि मंत्री झालो पाहिजे असे वाटते ही प्रतिष्ठा ते त्यांच्या कृतीतून जपतीलच असे नाही परंतु इथे सर्वसामान्य माणसांना कोणताच आशेचा किरण दिसत नाही , त्यांच्या नशिबी काबाड कष्ट आणि जीएसटी आणि इतर महागाई यामुळे त्यांचे कंबरडे मोडून गेले आहे ते त्यांच्या मुलाबाळांचं आणि त्यांचं आरोग्य शिक्षण अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा देखील पूर्ण करू शकत नाहीत असा 21 व्या शतकातील सर्वसामान्य माणूस हवालदिल झालेला आहे अशीच परिस्थिती पुढे पाच दहा वर्षे जर राहिली तर लोकांच्या आत्महत्या वाढतील.
विवाह संस्था पूर्ण कोलमडून टाकलेली आहे.
हम दो हमारे दो असे म्हणत नाते कमी असून नात्यातील दुरावा वाढत चाललेला आहे. सर्वजण संकुचित विचारांनी जीवन जगत आहेत. शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजार जास्त वाढलेले आहेत तसेच माणसांचं आयुर्मान हे खूप कमी झालेला आहे मधुमेह कॅन्सर सारखे आजार आता प्रत्येकाच्या घरामध्ये घुसलेले आहेत. कायदा कानून आणि सरकारी योजना ह्या कुचकामी झालेल्या आहेत. भारतामध्ये लवकरच आणीबाणीची वेळ येऊ शकते.

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ