लॉ ऑफ attractions(आकर्षणाचा सिद्धांत)
लॉ ऑफ attraction.. भाग 1
(आकर्षणाचा सिद्धांत)
आपल्या टेंशन घेण्याने प्रश्न सुटणार नाहीत उलट प्रश्न वाढतील. जीवन हे बिना प्रश्नाचे नाही ,नसते. आयुष्यात आपण हतबल झालो की आपण घाबरणार.आपण घाबरलो की आणखी दोन नवीन प्रश्न आपल्यासमोर उभे राहण्यासाठी तयारच असतात.आणि मग आपणच म्हणतो माझ्या मागे का असे?
मीच एवढा का अडचणीत?
मी कधी कोणाचे वाईट केले नाही,कधी कोणाचे वाईट चींतीले नाही मग तरी देखील मला का सामोरे जावे लागते एवढ्या अडचणींना?
हे सर्व कोण्या ऐय्रागैय्रा व्यक्तीच्या मागे नसते,सामान्य माणसाच्या मागे सामान्य प्रश्न असतात.गरीब माणसाला आपल्या दृष्टीने साधे प्रश्न असतात पण सेलिब्रिटी ला सेलिब्रिटी सारखे प्रश्न असतात.नेते मंडळींना त्यांच्या लेव्हल नुसार प्रश्न असतात. हे सर्व कोण नियोजन करत असेल ? ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार त्यांना समस्या ,सुख ,दुःख देणे. देव करत असेल का हे सर्व?
नाही देव नाही करत पण आपल्याला हताश झाल्यावर नक्की वाटेल की देवच हे सर्व समता ठेवण्यासाठी करत असेल.पण हे सर्वच व्यक्ती सोबत घडते का? तर याच उत्तर नाही येते. मग काय कारण असेल या मागचे तर सतत सवय लागून जाते आपल्याला तसा विचार करण्याची? मनात भीती असते कसं होईल? कसं होईल? संभ्रम असतो मनात. तसे पाहिले तर एवढ्या पटकन विचारांनी माणूस बदलून जातं नाही आणि त्यामुळे परिस्थिती देखील बदलत नाही.
हे सर्व मनाचे खेळ आहेत.खरे तर याला आकर्षणाचा सिद्धांत म्हणता येईल. लॉ ऑफ attraction.
लॉ ऑफ attraction जाणून घेतले ,समजून घेतले तर सर्व सुरळीत वेवस्थित होईल.पुन्हा गाडी रुळावर येईल आणि आपण सकारात्मक विचार केला की गाडी रुळावरून धावेल.
लॉ ऑफ attraction हा नियम शिकण्यासाठी जास्त काही करायची गरज नाही.यासाठी केवळ स्वतः ला वेळ द्यायचा, आपण आपल्यावर प्रेम करायचं ,आपण आपल्यावर विश्वास ठेवायचा, आपण आपल्याला समजून घ्यायचे, स्वताला कोस सोडून बाहेर पडता आले पाहिजे. आपण आपल्या मर्यादा आखत असतो नकळतपणे आणि मानसिक रुग्ण बनता बनता शारीरिक रुग्ण बनून जातो.
क्रमशः...
लेबल: हे माहीत आहे का तुम्हाला? माहित नसेल तर अवश्य जाणून घ्या.

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ