असमाधानी माणसेच जीवनात यशस्वी होतात.
"खरच माणूस हा कधीच समाधानी राहत नाही."
" हेच तर माणूस असण्याचे वैशिष्ट्य आहे."
जे आहे त्याचा उपयोग नाही करणार पण एक जरी त्याच्याकडे कमी असेल तर त्यासाठी रडत बसणार,असमाधानी राहणार.
होय आपण जे अनुभवले, ऐकले आणि पाहिले बहुतांशी असेच आहे. आपल्या आजूबाजूला कितीही श्रीमंत व्यक्ती आपण पाहिला तर तो कशाची ना कशाची तरी चिंता करत असतो. त्याच्या तुलनेमध्ये एखादा कष्टकरी गरीब शेतकरी बघितला तर तो दुःखी दिसत नाही जरी त्याच्याकडे अनेक संकट अनेक समस्या अनेक कमी असतील तरीही.
अर्थशास्त्राचा नियम आहे, जो व्यक्ती जास्त पैसा खर्च करतो तोच व्यक्ती जास्त पैसा कमवतो.
माणूस हा बहुतांश वेळा दुसऱ्याकडे बघून जगतो, दुसऱ्याकडे बघून निर्णय घेतो, कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. 21 व्या शतकातील माणूस सोळाव्या शतकातील माणसापेक्षा विचाराने निश्चित भिन्न आहे. त्याचे कारण असे आहे की सोळाव्या शतकातील माणसाच्या भोवती ज्या गोष्टी म्हणजे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक त्याचबरोबर शैक्षणिक परिस्थिती होती तशी परिस्थिती आज नाही. माणसाच्या त्या वेळीच्या गरजा आणि आत्ताच्या गरजा जरी सारख्या असल्या तरीही माणसाच्या त्यावेळच्या अपेक्षा आणि आत्ताच्या अपेक्षा यामध्ये निश्चितपणे बदल आहे म्हणून आजचा माणूस पूर्वीच्या माणसापेक्षा भिन्न आहे.
माणूस त्याच्या पूर्वीच्या पिढ्यांचा वारसा घेतो तो विचारांमध्ये बुद्धीमध्ये तसेच विविध गोष्टींमध्ये त्याच्या घराचा आणि समाजाचा प्रभाव असतोच.
यापूर्वी आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन पाहिले आहे. आपण सकारात्मक आणि नकारात्मक विचार याचा देखील अभ्यास चांगला केलेला आहे हे तुम्ही सर्व जाणता. जर आपल्याकडे एखादी भौवतीक ,एखादी मानसीक ,शारीरिक ,कौटुंबिक किंवा आणखी कशाची तरी कमी आहे. तर आपण लगेच नाराज ,निराश आणि हतबल होऊन बसणे कितपत योग्य आहे?
एखादा व्यक्ती जन्मतःच बहिरा आहे, एखादा व्यक्ती जन्मताच अंध आहे, एखाद्या व्यक्तीला जन्मताच दोन्ही पाय नाहीत तरीही अशी माणसं जीवनामध्ये स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी जगलेले उदाहरणे आहेत.
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर सारखा शास्त्रज्ञ किती प्रतिकूल परिस्थिती मधून सर्व निग्रो जातीसाठी आणि समस्त जगासाठी, जगातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी, जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी जगला आणि तो आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. वीणा गवाणकर यांचं एक होता कार्व्हर हे पुस्तक निश्चित वाचा.
ज्या व्यक्तीला जन्मापासून पायच नव्हते असा व्यक्ती संपूर्ण आयुष्य त्याच्या घरातून बाहेर कधी गेला नाही, खोलीतून कधी बाहेर गेला नाही तो जगाचा सुंदर पर्यटन यावर पुस्तक लिहितो आणि त्याला सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून जागतिक पुरस्कार देऊन सन्मान होतो. जेव्हा त्या जागतिक लेव्हलच्या संस्थेला माहीत होते की हा व्यक्ती कुठेही न जाता फक्त वाचनातून त्याने जग पाहिले अनुभवलं आणि तेच त्याचे अनुभव त्यांनी पुस्तकात लिहिले, मांडले. इतकं प्रभावी लेखन इतकी जबरदस्त इच्छाशक्ती कोण निर्माण करतं?
ज्या व्यक्तीमध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टीचा त्यांनी बाऊ केला नाही त्यामुळे त्यांना कोणता अडथळा आला नाही, त्यांनी कधी अडथळ येऊ दिला नाही. असा डग्लस नावाचा लेखक. सलाम त्याच्या प्रभावी आणि अतिउच्च लेखणीला, सलाम त्याच्या दुर्दमी इच्छाशक्तीला, घरात बसून जग फिरणाऱ्या त्या डग्लसला त्रिवार वंदन.
जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ब्रिटनमध्ये 8 जानेवारी 1942 मध्ये झाला. वयाच्या 21 व्या वर्षीच त्यांना दुर्लभ आजार झाला परंतु ते डगमगले नाहीत आणि संपूर्ण जगात सर्वतश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक बनले. स्टीफन हॉकिंग केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये सैद्धांतिक ब्रह्माण्ड विज्ञानाचे मुख्य होते. 92 टक्के शरीर साथ देत नव्हते.यांना अल्बर्ट आइंस्टीननंतर सर्वात मोठे भौतिकशास्त्री मानले जाते. कॉम्प्युटर आणि इतर गॅजेट्सच्या मदतीने ते आपले विचार व्यक्त करत होते.स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवरांच्या भौतिकशास्त्रावर काम केले . त्यांनी प्रस्तावित केले की कृष्णविवरांचा स्फोट होईपर्यंत ते उपअणु कण उत्सर्जित करतील. त्यांनी सर्वाधिक विकली जाणारी पुस्तके देखील लिहिली, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम: फ्रॉम द बिग बँग टू ब्लॅक होल्स (1988).
हेलन केलर , जी बाल्यावस्थेतच बहिरा आणि अंध बनली होती, तिच्या अपंगत्वावर मात करून एक प्रमुख लेखक, राजकीय कार्यकर्ता आणि व्याख्याता बनली. केलरचा प्रवास, तिच्या आत्मचरित्र, “द स्टोरी ऑफ माय लाइफ” मध्ये दर्शविल्याप्रमाणे, अशाच प्रकारच्या आव्हानांना तोंड देणाऱ्या असंख्य व्यक्तींसाठी एक प्रेरणा आहे.
देवेंद्र झाजरिया
देवेंद्रचा वयाच्या ८ व्या वर्षी विजेचा धक्का लागल्याने त्याचा हात कापला गेला आणि आज तो भारतातील सर्वात यशस्वी पॅरालिम्पिक स्पर्धक म्हणून ओळखला जातो आणि २००४ साली दोन सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला भारतीय पॅरालिम्पिक खेळाडू देखील आहे. अनुक्रमे 2016.
देवेंद्रचा वयाच्या ८ व्या वर्षी विजेचा धक्का लागल्याने त्याचा हात कापला गेला आणि आज तो भारतातील सर्वात यशस्वी पॅरालिम्पिक स्पर्धक म्हणून ओळखला जातो आणि २००४ साली दोन सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला भारतीय पॅरालिम्पिक खेळाडू देखील आहे. अनुक्रमे 2016.
लुडविग व्हॅन बीथोव्हेन
जर तुम्हाला फक्त एक अपंग संगीतकार माहित असेल तर तो बहुधा बीथोव्हेन आहे. श्रवणशक्ती गमावल्यानंतर कंपोझिंगसाठी प्रसिद्ध असलेले बीथोव्हेन हे शास्त्रीय संगीतातील ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहे.
सुधाचंद्रन
एक प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या तिसऱ्या वर्षापासून नृत्याची आवड वयाच्या 17 व्य वर्षी
उमेदीच्या काळात अपघातात पाय गमावल्यामुळे नैराश्य आले, अनेक संकटे आली तरीही हार न मानता परत पुन्हा भरत नाट्यम मध्ये यशस्वी झाली.
आपल्या भारतातच नव्हे तर जगात असे अनेक उदाहरणे देता येतील ज्यांनी दिव्यांग असून माउंट एव्हरस्ट सर केले. खरंच अशा सर्व ज्यांच्यामध्ये काहीतरी शारीरिक कमतरता असून देखील यशस्वी झाले अशा सर्व व्यक्तींना कोण आदर्श होतं?
कोणत्या जिद्दीच्या जोरावर आणि कोणाला आदर्श मांडून त्यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केली. जर आपल्याला एवढ्या असंख्य प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची ओळख नसेल तर जीवनामध्ये येऊन आपण नक्की वाचन करावे. अनेक दैवी आनंद देणाऱ्या गोष्टींपैकी वाचन करणे हा एक सोपा आणि साधा मार्ग आहे.
Reading is a divine happiness.
लेबल: प्रेरणा

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ