मानव जातीचा अनोखा इतिहास , सेपियन्सचा आणि आपला आजचा आहार.
सेपियन्स, मानव जातीचा अनोखा इतिहास लेखक युव्हाल नोआ हरारी यांच्या पुस्तकातून,
आपल्या सामाजिक मानसिक वैशिष्ट्यांना कृषीयुगापूर्वीच्या काळात आकार प्राप्त झाल्याचा दावा उत्क्रांती वादी मनोविज्ञानाचे नव्याने भरभराटीला आलेलं अभ्यास क्षेत्र करतो. आपला मेंदू आणि आपलं मन शिकार करणाऱ्या आणि फळकंदमुळे गोळा करणाऱ्या भटक्या जीवनासाठी अनुकूल आहेत असं आजही संबंधित क्षेत्रातले अभ्यासक म्हणतात. आपलं आजचं भोवताल महानगर विमान दूरध्वनी आणि संगणक यांनी व्यापला आहे आपली पूर्वज भटके शिकारी असताना विकसित झालेला आपला मेंदू आपली वर्तमानातली जीवनपद्धती ,आपल्या खाण्याच्या सवयी, संघर्ष आणि लैंगिकता या बाबी ठरत असतात.आजच्या पर्यावरणाला आपल्याला अधिक साधने स्त्रोत दिले आहेत.आपल्या आधीच्या पिढीपेक्षा आपल्याला दीर्घायुष्य लाभल आहे, पण या सर्व बाबींनीच आपल्याला अनेकदा परकेपणाची भावना,नैराश्य आणि ताण-तणाव दिले असल्याचं उत्क्रांती वादी मनोवैज्ञानिकांचे म्हणणं आहे.
या मागची कारण शोधण्यासाठी त्यांच्या मते आपण आपल्या भटक्या शिकारी पूर्वजांचा नीट अभ्यास केला पाहिजे. कारण अजूनही आपलं अचेतन मन भटक्या शिकारी पूर्वजांसारखंच आहे उदाहरणार्थ शरीराला फारसं उपकारक नसलेलं आणि भरपूर उष्मांक असलेलं अन्न लोक का खातात? आजची समृद्ध समाज लठ्ठपणाच्या त्रासदायिक समस्येची झगडताना दिसत आहेत. विकसनशील देशांमध्ये लठ्ठपणा वेगाने पसरताना दिसतो आहे. आपल्या भटक्या पूर्वजांच्या जीवनाचा आणि त्यांच्या खाण्याच्या सवयीचा विचार करता आपण गोड आणि चरबीयुक्त पदार्थांवर का तुटून पडतो हे एक कोडेच आहे. सॅव्हानाच्या गवताळ प्रदेशात आणि अरण्यांमध्ये जिथे सेपीन्यंसची वस्ती होती त्या प्रदेशांमध्ये भरपूर उष्मांक असलेल्या गोड पदार्थाचा तीव्र तुटवडा होता.तसेच तेथे सर्वसाधारण अन्नाचीही कमतरता होती. तीस हजार वर्षांपूर्वीच्या भटक्या माणसाजवळ पिकलेली फळ हाच मिष्ठांनाचा एकमेव प्रकार उपलब्ध होता.अश्मयुगातल्या एखाद्या स्त्रीला अंजीरांनी लगडलेलं झाड दिसलं तर स्थानिक बबनुच्या कळपाने ती अंजीर फस्त करण्यापूर्वी शक्य तेवढी फळ खाऊन घेणं हीच सर्वात समंजस गोष्ट होती.भरपूर उष्मांक असलेलं अन्न खाणं हे आपल्या गुणसूत्रांमध्येच नोंदवलेला आहे. आज आपण गगनचुंबी इमारती मधल्या आपार्टमेंट मध्ये राहतो .आपल्या घरामध्ये फ्रिज भरलेले असतात पण आपल्या डीएनएच्या हिशोबाने मात्र आपण अजून सॅव्हानातच आहोत म्हणूनच आपण फ्रिज मधले आईस्क्रीम चा अख्खा डब्बा फस्त करतो आणि त्यावर कोको कोलाची भली मोठी बाटली ही पिऊन रिकामी करतो.
Fun constructive learning
The unique history of mankind, sapiens and our diet today.
April 29, 2023

From author Yuval Na Harari's book Sapiens, A Unique History of Humankind, the newly burgeoning field of evolutionary psychology claims that our social and psychological traits took shape in pre-agricultural times. Even today, scholars in the field say that our brains and our minds are better suited for nomadic life as hunters and gatherers of tubers. Our environment today is filled with metropolises, airplanes, telephones and computers. Our brains, developed when our ancestors were nomadic hunters, shape our current lifestyles, our eating habits, conflicts and sexuality. Today's environment has given us more resources. It is possible, but evolutionary psychologists say that all these things have often given us feelings of alienation, depression and stress.
To find out the reason behind this, according to him, we should study our nomadic hunter-gatherer ancestors. Because our unconscious mind is still the same as that of the nomadic hunter-gatherer ancestors. For example, why do people eat food that is not very beneficial to the body and has a lot of calories? Today's affluent societies seem to be grappling with the troubling problem of obesity. Obesity appears to be spreading rapidly in developing countries. Considering the life and eating habits of our nomadic ancestors, why we crave sweet and fatty foods is a puzzle. In the savannah grasslands and forests where sapiens lived, there was a severe shortage of caloric-rich sweeteners, as well as general food shortages. Ripe fruit was the only form of sweetener available to the nomadic man thirty thousand years ago. If a woman in the Stone Age saw a tree covered in figs, the most sensible thing to do was to eat as much fruit as possible before the herd of local baboons devoured the figs. . Today, we live in apartments in skyscrapers. Our refrigerators are full, but according to our DNA, we are still in the savannah, so we open the entire ice cream box in the refrigerator and empty it by drinking a big bottle of Coco Cola.
Health and food
लेबल: Helth and food

1 टिप्पण्या:
Very Nice sir
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ