सोमवार, २३ जून, २०२५

काय अपेक्षित असावं स्त्रियांना महिला दिनानिमित्त..


💐🙏 *आज जागतिक महिला दिन* 🙏
खरे तर निसर्गाने मनुष्यजन्म निर्माण केला. त्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोन जाती निर्माण केल्या. यामध्ये तितकासा बदल नाही. फक्त नवनिर्मितीसाठी स्त्रियांमध्ये बदल असला तरी तो बदल नक्कीच सहनशील ते साठीच आहे असा वाटतो.
        *जशा आज माणसाने कामावरून माणसांच्या जाती ठरवल्या त्याचप्रमाणे पुरुष आणि स्त्री यांना देखील निसर्गाने आपले स्वतःचे काम दिलेले आहे.*
         मनुष्याचे शारीरिक मानसिक तसेच सर्व अंगाने जर विचार केला तर तुझ्या कामांमध्ये तो ज्या ठिकाणी तुझ्या परिस्थितीमध्ये असतो त्याप्रमाणे तो घडतो. मग ती स्त्री असो की पुरुष. 
      अनेकदा स्त्रियांना वाटत असेल की मी स्त्री जन्मच का घेतला? 
कदाचित पुरुषांना समाधान वाटत असेल आपण पुरुष जन्म घेतला तो. एकंदरीत आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या आपल्या घरामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे हे तर सर्वांना मान्य आहे म्हणजेच या ठिकाणी स्त्रियांना तेवढे स्थान महत्त्व दिले जात नाही. 
     तरीदेखील ताराबाई शिंदे या त्यांच्या स्त्री-पुरुष तुलना या ग्रंथामध्ये असे लिहितात की नवऱ्याला योग्य मानसन्मान दिला गेला पाहिजे. 
       स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये असमानता कोणत्या गोष्टींमध्ये वाटते तर फक्त आदर, मानसन्मान, समजून घेणे, त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहेत, स्त्री आणि पुरुष असे वेगळे समजून वागणूक  या काही गोष्टींमध्ये आजही भेदभाव आहे. 
      त्यामुळेच मधल्या काळामध्ये स्त्रीभ्रूणहत्या झाल्या. संत तुकाराम महाराजांनी त्यापूर्वी देखील सांगितले होते तरी देखील नवसे सायासे , वेगवेगळ्या गोष्टी मुलाच्या अट्टहासापोटी झाल्या आणि होत आहेत. 
   विज्ञान जरी सांगत असेल X आणि Y गुणसूत्रे तरीसुद्धा एवढ्या खोलात जाऊन त्या एका पुरुषासाठी एवढा खटाटोप का? त्या वंशाच्या दिव्यासाठी एवढा आटापिटा का? 
उभा विषय मुलासाठी आणि त्या पोरांसाठी प्रॉपर्टी आणि संपत्ती मिळवण्यामध्ये पूर्ण आयुष्य स्वतःकडे लक्ष न देणारी आई बाप म्हणजे स्त्री आणि पुरुष देखील या समाजामध्ये आहेत. 
   याउलट मुलगी वंशाचा दिवा होऊ शकते ,होते. ती दोन्ही कडील कुटुंबांना चांगलं सांभाळू शकते, आज आणि आजपर्यंतच्या इतिहासात जेलमध्ये स्त्रियांची संख्या कैदी म्हणून कमी आहे, व्यसनाधीनतेच्या विळख्यामध्ये स्त्रिया नगण्य आहेत, भ्रष्टाचार लूटमार दरोडे यामध्ये देखील पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कमी आहेत. थोडक्यात वाईट कामांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया या अल्प प्रमाणामध्ये आहेत. 
     तरीही स्त्रियांना दुय्यम स्थान स्त्रियांना नाकारले जाते स्त्रियांना सन्मान दिला जात नाही ही पुरुषप्रधान संस्कृती आपल्या देशाला तसेच आपल्या कुटुंबाला महासत्ता विकसित राष्ट्र विकसित कुटुंब याकडे घेऊन जाणारी नाही. 
      किरण बेदी सिंधुताई सपकाळ अशा अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण पहात असलो तरी संघर्षाचं अतिउच्च टोक त्यांनी गाठलेले आहे तेव्हा कुठेतरी त्या वाईट परिस्थितीला नकारात्मकतेला पुरुषी होलिका या सर्वांचे दहन करून त्यांनी स्वतःच अस्तित्व कायम ठेवले म्हणून स्त्रिया कमी प्रमाणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तितक्याच प्रकर्षाने ताऱ्यासारख्या चमकत आहेत.
      जर खरोखरच आपल्याला जागतिक महिला दिन करायचा असेल तर आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक दिवशी महिलां मधील सहनशीलता, समजूतदारपणा, त्याग सामंजस्य ,ममत्व, सृजनशीलता, नवनिर्मिती, सहयोगी भावना, नैतिकतेची कास, प्रेम सागर, आई बहीण मुलगी, पत्नी यामधील प्रत्येक रोल मॉडेल पुरुषांमध्ये ट्रान्सफर करता आले तर... दुसऱ्याची गुण घेता आले नाही तरी ओळखता येऊन त्याबद्दल कृतज्ञ राहिले तरी देखील आज समाजामध्ये न्यायालयामधील 50% खटले बरखास्त होतील.
      *महायुद्धाची सुरुवात ही घरातून होते हे कायम लक्षात असू द्या.*

*पुनश्च एकदा प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक भावनाशील, चिंतनशील विनयशील व्यक्तीस महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!*
   
     इथे मी माझ्या विचारांची प्रसूती केली, एक टक्का तरी मला त्या स्त्रियांच्या प्रसूतीच्या वेदना मांडता आल्या की नाही माहित नाही? असंख्य वेदना त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत त्या फक्त पुरुषांच्या समजून घेण्यामुळे कमी होऊ शकतात असे स्त्रियांना वाटत असावे असे मला वाटते.

✍️ सतीश शारदा आसाराम वराट.

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ