सोमवार, २० मे, २०२४

फक्त याच शाळांमध्ये तुमच्या पाल्याच्या शिक्षणाची आणि गुणवत्तेची हमी घेतली जाते.


अनेक इंग्लिश स्कूल, सैनिकी शाळा, अनेकांच्या जाहिराती पाहून लक्षात येते , अनेक खाजगी शाळा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन ते गुणवत्ता यादीमध्ये आले तरच त्यांचा प्रवेश घेतात, त्यानंतर शाळा आणि पुन्हा खाजगी शिकवणी ट्युशन तरीही विद्यार्थ्यांची प्रगती पालकांवरच अवलंबून.  येथील खजगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळांमध्ये अनेक चांगल्या कृती घेतल्या जात असून त्याचबरोबर प्रत्येक विषय शैक्षणिक साहित्यासह आनंददायी आणि रचनात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांचं बालपण आणि आनंद जोपासत त्यांना घडवलं जातं. 
जिल्हा परिषद शाळांमध्ये आम्ही विश्वास आणि खात्री देतो त्या शंभर टक्के विद्यार्थ्यांची. 
शून्य प्रगती असलेला विद्यार्थी देखील 100% प्रगती करेल. 
ज्या विद्यार्थ्यांची सर्व विषयातील सर्व कौशल्य पूर्ण आहेत त्याला आणखीन गती देण्याचे काम जिल्हा परिषद शाळा करतील.
        तेही मोफत. 
 मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश तसेच शूज आणि सॉक्स सहित.
       पालकांनी आपल्या मुलांना भरमसाठ फीस भरून खाजगी शाळांमध्ये पाठवून आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान करून घेऊ नका असे आवाहन बीड जिल्हा परिषदेच्या शाळेमधील सर्व शिक्षक तसेच अधिकारी वर्ग करत आहेत. 
        याव्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी समस्या असतील तर आपल्या जिल्हा परिषद तसेच गटशिक्षणाधिकारी कार्यालय त्याचबरोबर केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी शाळेचे मुख्याध्यापक यांना प्रत्यक्ष भेटा संपर्क करा आणि आपल्या आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद म्हणजेच सरकारी शाळांमध्ये निश्चित करून गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण पद्धतीचा लाभ घ्या.
          उन्हाळ्याच्या सुट्ट्या खाजगी शाळेमध्ये अल्पशा पगारावर आपले घर चालवणारे शिक्षक शिक्षिका मोठ्या आशेने त्यांचा पगार वाढेल त्यांचे जीवन सुधरेल म्हणून तुमच्या घरी येतील तुमच्या मुलाच्या ऍडमिशन साठी. मोठमोठी आश्वासन देतील मोठमोठा विश्वास दाखवतील पण आज पर्यंत जिल्हा परिषद शाळांमध्ये जे साहित्य जे शिक्षक आणि जे विद्यार्थी घडतात त्याची बरोबरी खाजगी शाळेतील कोणीही करू शकत नाही. 
        थोडक्यात खाजगी आणि सरकारी शाळेतील फरक तुम्हाला सांगतो. 
1)खाजगी शाळा ही पैसा कमावण्याच्या दृष्टीने सुरू झाली आहे. नाही की तुमच्या मुलाची शिक्षणाची चांगली गरज भागवी म्हणून
2) सरकारी शाळेमध्ये गणित मराठी इंग्रजी यांचे शैक्षणिक साहित्य त्याचबरोबर प्रशिक्षित शिक्षक असून दरवर्षी त्यांची वेगवेगळी प्रशिक्षणे शासनांमार्फत घेतली जातात त्याचबरोबर या शाळांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते. 
3) खाजगी शाळा शिफ्ट मध्ये भरते सरकारी शाळा पूर्ण वेळ भरते. 
4) खाजगी शाळेमध्ये भरमसाठ फीज घेऊन विद्यार्थ्यांना खाजगी ट्युशन लावावी लागते तरीही घरी पालकांनी अभ्यास घेतला नाही म्हणून तुमचा पाल्य पाठीमागे असा ठपका ठेवला जातो. 
5) खाजगी शाळेतील शिक्षक नेहमी बदलत राहतात, त्यांची शैक्षणिक पात्रता तसेच प्रशिक्षण असेलच असे नाही. सरकारी शाळेमध्ये त्यांच्यावर जबाबदारी आणि कर्तव्य दोन्हीही गोष्टी असतात. 
6) सरकारी शाळेमध्ये कोणत्याच विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला जात नाही आणि फक्त परीक्षा घेऊन हुशार विद्यार्थीच घेतले जात नसून सर्व विद्यार्थी यांना प्रवेश असतो तोही मोफत. 
7) इथे अनेक प्रकारची अनेक गुणवत्तेची विद्यार्थी असले तरी त्यांना त्या त्याप्रमाणे अभ्यास दिला जातो कारण इथे शिक्षक प्रशिक्षित आहेत. 
          अनेक मुद्दे सांगता येतील पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा पालकांना भुरळ पाडणाऱ्या शाळा दिसतात,  त्या भव्य दव्य इमारती
 तुमच्याच पैशातून बांधलेले आहेत हे विसरू नका. जिल्हा परिषद शाळांमध्ये तुमची फीस घेतली जात नाही पण तुमचं लेकरू हे उद्याचे भविष्य आहे त्याच्यासोबत त्याच्या भविष्यासोबत त्याच्या शिक्षणासोबत खेळले जात नाही. 
  ही शंभर टक्के हमी आम्ही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणारे सर्व शिक्षक देतो. 
        बाकी आपण सुज्ञ आहात.