बुधवार, १२ एप्रिल, २०२३

सावधान यामुळे होत आहे कॅन्सर.


गॅसच्या जाळावर भाकरी, चपाती भाजल्याने होत आहे कॅन्सर.

होय हे खरे आहे आजपर्यंत आपण कॅन्सर होण्याची अनेक कारणे पाहिली ऐकली वाचली परंतु याकडे आपलं लक्ष गेलं नाही आज आठ ते दहा घरांमध्ये एक कॅन्सर रुग्ण आढळून येत आहे. कॅन्सर हा आजार खूप जीवघेणा आहे आजची बदलती जीवनशैली हे मुख्य कारण आपण कॅन्सरचे समजत होतो परंतु रोजच गॅस वरील डायरेक्ट भाजलेली भाकरी आहारामध्ये जात होती. शक्यतो चपाती  गॅसच्या जाळावरती भाजत नाह परंतु भाकरी मात्र गॅसच्या जाळावरती भाजली जाते. हे जीवघेणं आहे आपण स्वतःहून कॅन्सर ला आमंत्रण देत आहोत.

गॅस ऐवजी चूल पुन्हा येईल की नवीन पर्याय....


आज शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात देखील घरोघरी गॅस पोचलेलाआहे, परंतु आपणास हे माहित आहे का याचे दुष्परिणाम किती भयानक आहेत. आधुनिक साधनांचा उपयोग जलद गतीने आपल्याला सुविधा मिळाव्यात यासाठी आपण करत आहोत परंतु या प्रत्येक कृती मागे आपला जीव जात आहे.
        गॅस वापरू नका चुलीचा वापर करा असे मी सांगणार नाही परंतु यापेक्षा वेगळे साधन यंत्र जे की धूर मुक्त असेल आणि विषमुक्त असे शोधावे लागेल. यामध्ये कोळशावरील चुली आलेल्या आहेत ज्यामध्ये दूर होत नाही परंतु कोळसा कुठून आणायचा इंधन कुठून आणायचे यासाठी बायोगॅस देखील आहे. आपणास चांगल्या नैसर्गिक शास्त्रशुद्ध पद्धतीने जीवनमान जगता आले पाहिजे हे आपल्याला शिकावे लागेल.

रासायनिक शेती पेक्षा सेंद्रिय शेती ठरते उपयुक्त.....

रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सर्वांना माहीत आहे परंतु भरपूर उत्पादन हा एकमेव फायदा सोडता दुसरा कोणताही फायदा रासायनिक शेतीपासून नसून फक्त दुष्परिणाम दुष्परिणाम आणि दुष्परिणाम आहेत.
     नैसर्गिक आणि शास्त्रशुद्ध म्हणजे सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती ही जमिनीचा पोत सुधारून मनुष्याचे आरोग्य सुधारण्याचे चांगले ठेवण्याचे काम करते. त्यामुळे आपल्या भारतामध्ये जो की कृषी प्रधान देश आहे या ठिकाणी शालेय अभ्यासक्रमामध्ये सेंद्रिय शेती आणि त्याची फायदे ही समाविष्ट करून शिक्षण देणे गरजेचे आहे.


लेबल:

बीएड धारकांना खुशखबर केंद्रप्रमुख ,विस्तार अधिकारी यांची लवकरच भरती होणार.



News24

 11 एप्रिल 2023 रोजी निघालेल्या सर्व विभागीय आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे की आपल्याकडे केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली आहे यासंदर्भात हे दुसरे पत्र निघालेले आहे. यापूर्वीच 05मे 2022 मध्ये रिक्त पदा ची माहिती आणि पदभरती करण्यासंदर्भात शासन स्तरावरून हालचाली सुरू झालेल्या आहेत.

आता Bed धारकांची प्रतीक्षा संपली.

केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांची भरती होणार आहे त्यासाठी अनेक शिक्षकांनी बी एड हा कोर्स पूर्ण केलेला आहे परंतु गेल्या पंधरा वर्षापासून केंद्रप्रमुख आणि विस्ताराधिकारी यांची भरती झाली नव्हती.
   आज पर्यंत शासन प्रमोशन द्वारे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी ही पदे भरत होती परंतु आता मात्र 50% प्रमोशन आणि 50 टक्के सरळ सेवा भरती याप्रमाणे केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी भरती होणार आहे.
अंकगणित बुद्धिमत्ता तसेच शिक्षण क्षेत्राविषयीचे अधिनियम आणि मानसशास्त्र या संदर्भात होणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम असेल.
आता शिक्षण क्षेत्रात यामुळे एक चांगला बदल दिसून येईल.






लेबल: