भाषा शिक्षण
कोणतीही भाषा शिकत असताना त्या भाषेची चार कौशल्य, चार पायऱ्या आहेत त्याप्रमाणे आपण ती भाषा शिकू शकतो.
आपली मातृभाषा मराठी असेल तर मराठी शिकण्यासाठी सुद्धा या चार पायऱ्या चार, कौशल्य आहेत.
श्रवण
भाषण
वाचन
आणि लेखन
सुरुवात प्रत्येक भाषेची ही श्रवण करूनच होते. ही नैसर्गिक आणि शास्त्रशुद्ध पद्धत आहे.
जर आपणास इंग्रजी भाषा शिकायची असेल तर लेखन writing या पायरी पासून बरेच जण सुरुवात करतात. म्हणजे अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 🔠 ABCD.. लिहिण्यासाठी सांगितली जाते. मग वाचन त्यानंतर भाषण आणि शेवटी श्रवण अशा चुकीच्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इंग्रजी शिकवल्यामुळे विद्यार्थी बरेच जण इंग्रजीमध्ये पुढे जात नाहीत किंवा खूप जास्तीचा वेळ लागतो.
नर्सरी, प्ले ग्रुप किंवा प्रायमरी शाळेमध्ये जर आपण इंग्रजी विद्यार्थ्यांना ऐकण्यासाठी, त्यांच्यासोबत इंग्रजी मध्ये संवाद साधून इंग्रजी लेखन हे शेवटच्या टप्प्यामध्ये घेतले तर हे नैसर्गिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने होईल.
रोज दैनंदिन जीवनामध्ये बोलल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या इंग्रजी मधूनच घरामध्ये आणि शिक्षकांनी बोलल्या पाहिजेत जेणेकरून ते त्या लहान मुलांच्या कानावरती पडेल. सूचना असतील, विनंती असेल ,आदेश असतील छोटे छोटे वाक्य असतील हे इंग्रजी मधूनच मुलांच्या कानावर पडले गेले पाहिजेत.
मराठी भाषेमध्ये जवळजवळ 52 अक्षर आहेत त्यापेक्षा निम्मे अक्षरे म्हणजे 26 अक्षर इंग्रजीमध्ये आहेत या 26 अक्षरावरूनच सर्व इंग्रजीचे लेखन आणि वाचन हे कौशल्य आपण करू शकतो.
प्रत्येक भाषेमध्ये स्वर आणि व्यंजने आहेत त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये देखील a,e,i,o,u हे पाच स्वर आहेत.
सर्वात अगोदर आपण तीन अक्षरी शब्द वाचन करण्यासाठी शिकवू शकतो.
जसे - ,bat, pen,hit, dog, cut.
यास आपण CVC पॅटर्न संबोधू शकतो.
इंग्रजी विषय शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी कुठून सुरुवात केली पाहिजे तर स्वतःच्या शरीरापासून म्हणजेच बॉडी पार्ट्स.
नंतर यावरून वाक्य वाढवत वाढवत जाऊन आपण मुलांना सभोवतालचा परिसर समाज आणि जगातील इतर बाबतीत संपूर्ण नॉलेज इंग्रजी मधून घेण्यासाठी तयार करू शकतो.

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ